Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात! महापौरांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव प्रतिनिधी । शहरात अमृत आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून मंगळवारी प्रभाग ८ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीसाठी मक्ता देण्यात आला आहे. मंगळवारी प्रभाग ८ मध्ये एसएमआयटी, जळगाव-सुरत रेल्वे गेट जवळील रस्त्याच्या दुरुस्तीचा महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर सुनिल खडके, नगरसेविका प्रतिभा पाटील, शाखा अभियंता प्रकाश पाटील, मक्तेदार डी.एच.पाटील आदी उपस्थित होते

Exit mobile version