Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्ता दुरुस्तीसाठी आमदारांना निवेदन

 

फैजपूर : प्रतिनिधी । येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुली पासून पिंपरूड फाटा पर्यंत डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झालेला असून रस्ता दुरुस्त करण्यासाठी आ. शिरीषदादा चौधरी यांना नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे सह आदी कार्यकर्त्यांनी खिरोदा येथे जाऊन निवेदन दिले,

आ. चौधरी यांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. गेल्या 3 वर्षांपासून फैजपूर येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुली पासून पिंपरूड फाटा पर्यंत डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झालेला असून या 2 कि.मी. रस्त्यावर खड्डे खूप आहेत, त्या रस्त्यावरून जाणे येणे दुचाकी, चारचाकी वाहतूक अत्यंत कठीण झालेली आहे, नागरिकांना मधुकर कारखाना मार्गे भुसावळ जावे लागत आहे, परंतु विरोदा, वढोदा, पिंपरूड, करंजी या गावांना जाणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे,

दुचाकी, चारचाकी गाड्यांचे अतोनात नुकसान होत आहे, तात्काळ भुसावळ रास्ता दुरुस्ती करण्यात यावी यासाठी फैजपूर येथील नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, गटनेते कलीम मण्यार, मनोहर नेमाडे, काँग्रेस शहराध्यक्ष शे. रियाज, मनोज पाटील, शेतकरी राजेश चौधरी, आदीं नागरीकांनी आ. शिरीषदादा चौधरी यांना खिरोदा येथे जाऊन निवेदन दिले, त्यावर आ. चौधरी यांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे.

Exit mobile version