रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामीण इंडस्ट्रीज फलकाचे उद्घाटन

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी ग्रामीण इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात आली असून या इंडस्ट्रीजच्या फलकाचे रविवार २२ नोव्हेंबर रोजी उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उमाळा -नशिराबाद रोड जवळील भाग्यश्री पॉलीमर्सच्या समोर होणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकान्वये अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी दिली आहे.

जिल्ह्यात अनेक उद्योजकांनी त्यांच्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्या विविध समस्या सोडविणे आणि सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात ही संघटना मोलाची भूमिका पार पाडेल, अशी आशा अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी व्यक्त केली आहे. याबाबत असोसिएशनचे उद्देश सांगताना ते म्हणाले की,  जळगाव तालुक्यातील उमाळा-नशिराबाद रोड परिसरात अनेक छोटे-मोठे उद्योजकांनी विविध कंपन्या सुरू केल्या आहे. आता जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थेतर्फे उद्योजकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच उदयोजकाच्या विविध अडचणी व समस्या सोडविणे या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनच्या फलकाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवार दि.२२ रोजी सकाळी १० वाजता उमाळा -नशिराबाद रोड जवळील भाग्यश्री पॉलीमर्सच्या समोर होणार आहे. कार्यक्रमास अध्यक्ष सचिन लढ्ढा, उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव हमीद मेमन, खजिनदार राजीव बियाणी,व सदस्य आदी उपस्थित राहणार आहे.

Protected Content