रविवारी कोचुर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा

सावदा , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील कोचुर येथे रविवार दि. ८ मे रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कोचुर बुद्रुक येथील जि. प. मराठी मुलांची शाळेत रविवार दि. ८ मे रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यात कै. ब्रिजलाल पुना पाटील व कै. पांडुरंग पुना पाटील यांच्या स्मरणार्थ व स्वर्ग रथ लोकार्पण, गुणवंत विद्यार्थी व कृषी पुरस्कार विजेते यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचे आयोजन सुनील पाटील युवा मंच कोचुरतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील , जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालक अॅड. रोहिणीताई खडसे, माफदाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष विनोद तराळ, माजी आमदार अरुण दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, रावेर येथील रमेश नागराज पाटील, सोपान पाटील, नगराध्यक्ष अनिता येवले, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, रेखा वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष ,कायकर्ते ह्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुनील पाटील युवा मंच कोचुरतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content