Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रमजान ईद पर्यंत दुकाने बंद ठेवा- चाळीसगावात मुस्लीम समुदायाचे निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या कोरोनाच्या आपत्तीमुळे लॉकडाऊन सुरू असतांना रमजान ईद होईपर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवण्याची मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री या संकटातून राज्याच्या जनतेला वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तथापि, दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने काही ठिकाणी हॉटस्पॉट झोन मधे आलेले आहेत. त्या मुळे रमजान महिना व ईद निमित्ताने जर चाळीसगाव शहरामधे कापड दुकान बुट चप्पल शॉपिंग सेंटर, कॉस्मेटिक, बांगड्या आदींची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास या दुकानात मुस्लिम समाज बांधवांची गर्दी होऊ शकते. त्या मुळे सोशल डिस्टेंटसिंगचे पालन होणार नाही. आणि गर्दीत एखादा कोरोना बाधीत रुग्ण असल्यास चाळीसगाव शहर आणखी आटोक्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ८०%रूग्ण असे आहेत की त्यांना लक्षणे दिसत नाही परंतु ते पॉझिटीव्ह निघालेले आहेत. रमजान ईद पुढच्या वर्षी पुन्हा येईल परंतु एकदा गेलेले जिवन पुन्हा येणार नाही. म्हणून जनतेच्या व देशाच्या हिता साठी रमजान ईद होई पर्यन्त चाळीसगाव शहरातील वरील नमुद केलेली दुकाने यांना चालु ठेवण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version