Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रथ चौक ते पांझरापोळ रोडवरून गुरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रथ चौक ते पांझरापोळ रोडवरून गुरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनावर शनीपेठ पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रथ चौक ते पांझरपोळ रोडवरील भावसार मढीजवळून शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास (एमएच १९ एस ७१५७) या वाहनातून दोन गाई व दोन वासरू यांची कोंबून निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. नागरीकांच्या सतर्कतेने वाहन पकडण्यात आले. दरम्यान, पोलीसांचा जमाव पाहून चालक वाहन सोडून पसार झाला. शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहन ताब्यात घेतले. तर चारही गुरांची सुटका करण्यात आली आहे. वाहनात गुरांना श्वासोश्वास घेण्यासाठी कोणतीच जागा ठेवण्यात आलेली नव्हती.

याबाबत शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पोलीस नाईक अभिजीत सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश माळी करीत आहे.

Exit mobile version