Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण, प्रशासन ॲलर्ट

 

 

रत्नागिरी: वृत्तसंस्था । राज्यातील काही ठिकाणी डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. निर्बंध शिथील न केलेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा देखील समावेश आहे. त्यातचं जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण आढळल्यानं प्रशासन ॲलर्ट झालं आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका डेल्टा व्हेरिएंटचा हॉटस्पॉट ठरतोय. आता जिल्हा आरोग्य यंत्रणा हाय अ‌ॅलर्ट झालीय. रत्नागिरी जिल्ह्यात एकाच वेळी 20 पेक्षा जास्त रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये कंन्टेंटमेंट झोन करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 358 गावांमध्ये सध्या कन्टेंटमेंट झोन करण्यात आलेत.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डेल्टा वेरिएंटचे रुग्ण सापडलेल्या संगमेश्वरमधील एका वाडीत कडक कंन्टेंटमेंट झोन करण्यात आल्याची माहिची जिल्हा शल्यचिकित्सक संगमित्रा फुले यांनी दिलीय. या गावांमध्ये 100 टक्के लसीकरण आणि टेंस्टिंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं देखील त्यांनी सांगितलंय.

 

कोरोनाची दुसरी लाट किंवा दुसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असताना रत्नागिरीत जिल्ह्यात दोन नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले आहेत. दोन्ही रूग्ण हे संगमेश्वर तालुक्यातील असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काळजी करण्याचं कारण नाही. जवळपास महिनाभरापूर्वी या दोन रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट 9 ऑगस्टला प्राप्त झाला होता.

 

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ झालीय. राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबाद मध्ये देखील डेल्टाचा वेरियंट आढळल्याची माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, यामुळे घाबरून न जाण्याचा सल्ला देखील राजेश टोपे यांनी दिला होता.

17 आँगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होतायत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे दरोरोज 150 च्या घरात रुग्ण संख्या आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. पण शाळा सुरु होण्याच्या दृष्टीनं सध्या शाळा प्रशासनाची तयारी सुरु झालीय.

 

Exit mobile version