Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रणवीर कपूर गोत्यात : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फिर्याद

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्यात अभिनेता रणवीर कपूर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि त्याचे कुटुंब कायदेशीर अडचणीत अडकले आहे. त्याचा ख्रिसमस साजरा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणवीर ख्रिसमस केकवर दारू ओतताना आणि त्याला आग लावतांना जय माता दी म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी रणवीर वर टीका केली. आता त्याच्याविरुद्ध मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत वकील संजय तिवारी यांनी ही तक्रार केली आहे.

वकील संजय तिवारी यांनी रणवीर कपूरविरोधात तक्रार पत्रात म्हटले आहे की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये रणवीर केकवर दारू ओतत आहे आणि त्याला आग लावत आहे आणि जय माता म्हणत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही जय माता म्हणत आहेत. तक्रार पत्रात म्हटले आहे की, रणबीरने त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला होता. यावेळी त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. रणबीरने जे काही केले त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट, करिश्मा कपूर, कुणाल कपूर आणि कपूर कुटुंबातील इतर सदस्य दिसत आहेत.

दरम्यान, अलीकडेच रणवीर कपूरने यावर्षी ऍनिमल या चित्रपटाद्वारे प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर आपले यश दाखवण्यास सुरुवात केली. दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांच्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ८५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता मात्र सोशल मीडियातून चाहते त्याला ट्रोल करतांना दिसून येत आहेत.

Exit mobile version