धरणगाव येथे लिव्हिंग सर्टिफिकेट शुल्काला अभाविपचा विरोध

धरणगाव प्रतिनिधी । येथील एसीएस महाविद्यालयाकडून दाखालाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दोनशे रुपये प्रत्येकी वसुल केले जात आहेत, या शुल्क वसुलीला अभाविपने विरोध केला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणणे आहे की, असे शुल्क वसुल करणे चुकीचे आहे. कारण गेल्या 4 महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांची आधीच आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. त्यात हे महाविद्यालय अशा स्वरूपात विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अभाविपने प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. निवेदन देताना आदित्य नायर, दीपक धनगर, अशोक सोनवणे, दिपराज पाटील, आकाश पाटील, दिव्येश गुरव आदी उपस्थित होते.

Protected Content