Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योशिहिडे सुगा जपानचे नवे पंतप्रधान होणार

टोकियो , वृत्तसंस्था । योशिहिडे सुगा यांचा जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुगा यांची जपानच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे देशाचे नवे पंतप्रधान म्हणून लवकरच त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

विद्यमान पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती आस्वास्थ्यामुळे पंतप्रधान पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या पदासाठी झालेल्या पक्षाच्या निवडणुकीत सुगा यांनी सहजपणे विजय मिळवला. त्यामुळे सुगा यांची आबे यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड झाली आहे.

मुख्य कॅबिनेट सचिव असलेल्या योशिहिडे सुगा यांना एलडीपीच्या नेतेपदाच्या निवडणुकीत ५३४ पैकी ३७७ मतं मिळाली. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन प्रतिस्पर्धींविरोधात सहजपणे विजय मिळवला. जपानचे माजी संरक्षणंत्री शिगेरु इशिबा आणि माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा हे सुगा यांचे प्रतिस्पर्धी होते. यांपैकी इशिबा यांना ६८ तर किशिदा यांना ८९ मतं मिळाली.

जपानच्या संसदेतील एलडीपीचं बहुमत पाहता बुधवारी संसदीय मतं जिंकून सुगा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. एक मजबूत सरकारी सल्लागार आणि प्रवक्ते असलेल्या ७१ वर्षीय सुगा यांच्याकडे देशात स्थिरता आणणारा आणि आबे यांची धोरणं पुढे नेणारा नेता म्हणून पाहिलं जात आहे.

Exit mobile version