Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगेश पाटील यांची संचालकपदी निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना यात संचालक म्हणून योगेश पंढरीनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडचणी सोडवत, माहिती अधिकार व पत्रकारितेचे चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व मुख्य सचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिफारशीने राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेची उभारणी झाली आहे. भारताच्या शाश्वत विकासासाठी सदर संघटना आणि पदाधिकारी कार्य करत असतात. महाराष्ट्र तसेच, जळगाव-धूळे-नंदुरबार या तीन जिल्ह्यात जनतेच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी योगेश पाटील (9422772997,7058200221) हे नियुक्त आहे. महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर देवून जनतेच्या न्यायाच्या आणि हक्कासाठी लढा देणार असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version