Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगेश्वर नगरात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील योगेश्वर नगरातील ३८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज पहाटे उघडकीला आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, मनोहर शेनफडू माळी (वय-३८) रा. काशीबाई उखाजी कोल्हे शाळा, योगेश्वर नगर हा तरूण मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. रात्री कुटुंबियांसह जेवण करून झोपले. मध्यरात्री दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण नेमके कळू शकले नाही. नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी डॉ. भोळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज इंद्रकर करीत आहे. 

 

Exit mobile version