Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगी अदित्यनाथ यांना पितृशोक; लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला जाणार नाही

नवी दिल्ली वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पिता आनंदसिंह बिष्ट (वय-८९) यांचे दीर्घ आजाराने आज दिल्लीत निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांना उपचारासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथे दाखल करण्यात आले होते. मात्र देशात लॉकडाऊन असल्याने वडीलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकणार नाही असे जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याचे पिता आनंदसिंह बिष्ट यांचे आज सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी निधन झाले. उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील पंचूर गावचे रहिवासी असलेले आनंदसिंह बिष्ट यांची गेल्या महिन्यात आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. इथे त्यांना एबी वॉर्डात ठेवण्यात आले होते. गॅस्ट्रो विभागाचे डॉ. विनीत आहूजा यांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र, रविवारी त्यांची तब्येत खालावली होती.

आनंदसिंह बिस्ट हे उत्तराखंडमध्ये फॉरेस्ट रेंजर होते. ते सन १९९१ मध्ये निवृत्त झाले होते. आनंदसिंह यांना दीर्घ काळापासून मूत्रपिंडाचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यांचे डायलिसीस देखील केले होते. पौडी येथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सुरुवातीला जॉलीग्राँटच्या हिमालयन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. मात्र, इथे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्यांना दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते गावी येऊन राहू लागले होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्य पित्याच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, आपण शोकग्रस्त असून लॉकडाउनमुळे आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराला आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे.

Exit mobile version