Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगिता पाटील यांची संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी निवड

यावल, प्रतिनिधी | विरावली येथील रहिवासी  छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या सचिव  तथा ग्रामपंचायत सदस्या  योगिता देवकांत पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका सदस्यपदी निवड झाल्याने ग्रामपंचायतीच्या परिवर्तन  पॅनलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

विरावली ग्रामपंचायतीच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य शोभा युवराज पाटील, शकुंतला विजयसिंह पाटील, हमिदा टेनु तडवी व  अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील, ग्राम पंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यावल यांनी व विरावली  ग्रामपंचायत सदस्यांनी व गावातील जेष्ठ महिला कमलाबाई पाटील, प्रतिभा पाटील, कल्पना पाटील, कृष्णा पाटील आदींनी योगिता  पाटील यांचा  सत्कार करत अभिनंदन केले .  योगिता  पाटील यांनी  संजय गांधी निराधार योजनत त्यांची जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी  नियुक्ती केल्याबद्दल  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील,  यावल तालुक्यातून विरावली गावाला पहिल्यादाच एका उच्च शिक्षित  महिला प्रतिनिधीला च्या नावाला  शिफारस केल्याबद्दल  यावल -रावेर विधानसभेचे आमदार  शिरीष चौधरी व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष  शेखर सोपान पाटील यांनी निवड  केल्याबद्दल  आभार मानले.  विरावली गावसह परिसरातील तालुक्यातील  सर्व  निराधार महिलांना  न्याय  मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे  योगिता देवकांत पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले. यावल तालुक्यातील सर्वसामान्य गोर- गरीब-गरजू निराधार लोकांच्या हिता साठी काम करण्याची जबाबदारी  दिल्या बद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , जळगांव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  संदीप भैय्या पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताईनगर विधान सभेचे आमदार चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  तथा जि .प .सदस्य  प्रभाकर आप्पा सोनवणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले  विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र सोनवणे   यांचे त्यांनी आभार मानले आहे .  योगिता पाटील यांचे नियुक्तीबद्दल  विरावली  गावसह सह  तालुक्यातून सामाजिक व राजकीय  क्षेत्रातील  मान्यवरांनी सौ. पाटील यांना  अभिनंदन करून  पुढील  भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्या दिल्या आहेत.

Exit mobile version