Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

येस बँकेत एसबीआय करणार ४९ टक्के गुंतवणूक : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरबीआयने येस बँकेच्या बुनरबांधणी प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेतील ४९ टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज दिली आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण शुक्रवारी म्हणाल्या, आरबीआयने येस बँकेच्या बुनरबांधणी प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेतील ४९ टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या पुनरबांधणीचा प्रस्ताव सरकारपुढे मांडला होता. त्यालाच शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनरबांधणीच्या प्लॅनमध्ये येस बँक आणि सरकारला एसबीआयकडून मदत मिळणार आहे. त्यासोबतच, इतर गुंतवणूकदारांचा सध्या शोध घेतला जात आहे. एसबीआयकडून गुंतवणूक केल्या जाणाऱ्या इक्विटीपैकी २६ टक्के इक्विटी ३ वर्षांसाठी लॉक केल्या जाणार आहेत. इतर गुंतवणूकदारांना ७५ टक्के इक्विटी अशाच पद्धतीने लॉक कराव्या लागणार आहेत.

Exit mobile version