‘यूपीएससी’ ने नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखील २७ जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

 

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालेलं आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने नवीन  बाधित आढळून येत आहे. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

 

या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील टाकण्यात आलं आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा -२०२१ आणि भारतीय वन सेवा परीक्षा -२०२१ साठी २४ मार्ज पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.

 

 

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षा ‘अधिकृतरित्या’ रद्द झाल्या आहेत. दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक / प्रमाणपत्र देण्याबाबत, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Protected Content