Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवा उत्सव कार्यक्रमात कमलेश सोनवणे द्वितीय

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।   जिल्हा युवा उत्सव कार्यक्रमात पाचोरा येथील कमलेश सोनवणे याला वत्कृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याने खासदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र द्वारा देशभरात युवा उत्सव कार्यक्रम पार पडले. त्याचाच एक भाग म्हणून नेहरू युवा केंद्र, जळगाव द्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात जिल्हा युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात पाचोरा येथील कमलेश सोनवणे यांना वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील व नेहरू युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाश मनुरे यांच्या हस्ते कमलेश सोनवणेंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याच जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार कार्यक्रमास उपस्थित होते. कमलेश सोनवणे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Exit mobile version