Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवासेनेचे महापालिकेसमोर राज्यपाल व आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात युवासेनेच्या वतीने गुरूवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता महापालिकेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार चुकीचे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा निषेधार्थ गुरूवार ८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव महापालिकेसमोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या विरोराधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी महानगर समन्वयक महेश ठाकूर, शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हा अधिकारी विशाल वाणी, जिल्हा चिटणीस अंकित कासार, महानगर अधिकारी अमोल मोरे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, विधानसभा युवाधिकारी अमित जगताप, कॉलेज कक्ष प्रमुख प्रीतम शिंदे, शहर अधिकारी गजेंद्र कोळी, उपमहानगर अधिकारी मयूर गवळी, अजिंक्य कोळी , विभाग अधिकारी ऋषिकेश शर्मा, नीरज चौधरी, जयेश नेवे, यश राठोड, युवासेना कॉलेज कक्ष अधिकारी प्रवीण भगत, युवासेना कॉलेज कक्ष शहरप्रमुख धरणगांव तुषार न्हाळदे,हिमांशू सिसोदिया गौरव जैन जय कपूर, परेश चोपडा , यश बारी , सुशील पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version