Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवती व युवकांना “स्टार्टअप” मध्ये नामी संधी- पत्रकार दिपक नगरे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  युवतींना भविष्यात नव-नवीन संधी अनेक अवसर देऊ शकते.युवतींनी विकासाच्या मार्गावर जाण्याला जास्त पसंती दिली पाहीजे. आताच्या युवती/ युवकांनी विविध विषयांवर अध्ययन करून नवीन करिअर अथवा उद्योगाच्या अवसरांसाठी तयार राहावे. आताच्या मुलांना यशस्वी विकासाच्या वेगावर जाण्यास सक्षम करण्याचा संधी स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे मत जेष्ठ पत्रकार दिपक नगरे यांनी व्यक्त केले.

 

रावेर शहरातील व्ही एस नाईक कॉलेज मध्ये विद्यार्थी विकास विभाग तर्फे आत्मनिर्भर युवती अभियान आयोजित करण्यात आले होते.यावेळी युवती समोरील नव-नवीन संधी तसेच पत्रकारीता या विषयावर मुलांना मार्गदर्शन लाभले यावेळी श्री नगरे पत्रकारीता विषयावर बोलतांना पुढे म्हणाले की आताची पत्रकारीता जमीनीवरील व्यवस्थापन,राजकीय आणि सामाजिक समस्या, संचार आणि विद्यमान चालू घडामोडी इत्यादी विषयावर शिप्ट झाली आहे.लोकांच्या आरोग्याच्या कारणांसाठी आवश्यक माहीती प्रदान करत आहे.

 

सोशल मिडीया,न्यूज चॅनेल, रेडिओ आणि इंटरनेट या माध्यमांचा वापर करण्यात पत्रकारांनी यश मिळवले आहे. पत्रकारीता ही एक संवेदनशील आणि जबाबदारीचे क्षेत्र असुन माध्यमक्षेत्र समाजातील जटील समस्यांचे शोध आणि त्यांच्या निवारणासाठी सतत तयार राहत असल्याचे मत जेष्ठ पत्रकार दिपक नगरे यांनी व्यक्त केले. यावेळी व्ही.एस. नाइक, कॉलेजचे प्रिन्सिपल  प्रा डॉ दलाल, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस बी धनले, युवती सभा प्रमुख प्रा.एन. ए. घुले, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा मनोहर तायडे, मराठी विभाग प्रमुख प्रा चांदणी निळ व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

Exit mobile version