Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवकांचे कौशल्य आत्मनिर्भर भारताचा आधार – मोदी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नव्या पिढीचा कौशल्य विकास,  राष्ट्रीय गरज असून आत्मनिर्भर भारताचा मोठा आधार आहे. गेल्या ६ वर्षात बनलेल्या नव्या संस्थांच्या पूर्ण ताकदीने स्किल इंडिया मिशनला गती द्यावी लागेल असे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १५ जुलै २०२१ रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित केले.

 

“युवकांचे कौशल्य हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. आज कौशल्यांना जास्त मागणी आहे. जगासाठी भारताकडे स्मार्ट आणि कौशल्यवान मनुष्यबळ आहे. स्किल इंडियाचे ध्येय आपल्याला नव्याने चालवायचे आहे. कौशल्याद्वारे स्वत: आणि देशाला स्वावलंबी बनवले पाहिजे.” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शिक्षणाने आपल्याला काय करावे लागेल याची माहिती दिली तर कौशल्य आपल्याला ते कार्य वास्तविक स्वरूपात कसे केले जाईल हे शिकवते. हे सत्य जुळवण्यासाठी कौशल्य भारत मिशन हा एक कार्यक्रम आहे.”

 

“कौशल्य भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत अनेक युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आज लर्निंग सोबत अर्निंग देखील महत्वाचे आहे. आज जगात अशा कौशल्यांची मागणी आहे की जो कोणीही कौशल्यवान असेल तो पुढे जाईल.”, असे देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

 

Exit mobile version