Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युपीएचा अध्यक्ष होण्यात रस नाही- शरद पवार

 

मुंबई प्रतिनिधी । एकीकडे संजय राऊत हे शरद पवार यांनी युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केला असतांनाच खुद्द पवार यांनी आपल्याला यात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई: काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी करावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार लॉबींग सुरू केले आहे. त्यांनी अलीकडेच त्यांच्या लेखांमधून पवारांनी यूपीएचं नेतृत्त्व करावं असं मत व्यक्त केलं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावर शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे. मयूपीएचा अध्यक्ष होण्यात मला कोणताही रस नाही. माझ्या नावावरून अनावश्यक वाद निर्माण केला जाऊ नये. मी यूपीएचं अध्यक्ष व्हावं, हे शिवसेनेचं मत आहे. माझं नाही,फ असं पवार म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यामुळे त्यांनी या प्रकरणावरून आपले मत स्पष्ट केले आहे.

Exit mobile version