युतीच्या काळात मोफत उपचार; आघाडी शासनात नाही : गिरीष महाजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील भुसावळ मार्गावरील जनसेवा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी युतीच्या काळात शासनाच्या मदतीने गोरगरीबांचे मोफत उपचार झालेत पण आघाडी शासन काळात तशी मदत होतांना दिसत नसल्याचे आमदार महाजन यांनी सांगितले.

यावल शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. तसेच ऐन तारुण्यसह विविध स्तरातील नागरिकांना विविध आजार आजार जडत असल्याचे प्रमाणात देखील मोठी वाढ होतांना दिसत आहे. अर्थात त्याची विविध कारणे असू शकतात. अशा वेळी आपल्याच शहरात तात्काळ अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. त्यासाठी सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे.

खासगी रुग्णालयातून औषधोपचार महागडा पडत असला तरी युती शासनाच्या कार्यकाळात गोरगरीब रुग्णांचे आपण विविध योजनेसह ‘महात्मा फुले आरोग्य’ योजनेतून अनेकांचे प्राण वाचल्याचे उदाहरण आहे. असे मत माजी जलसंपदा मंत्री, आमदार गिरीश महाजन यांनी येथील जनसेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमास रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे, यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी, भुसावळचे आमदार संजय सावकारे जळगावचे आमदार तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष राजू मामा भोळे यांचेसह विविध पक्षाचे मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

 

येथील यावल भुसावळ मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या माजी नगरसेवक डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी माजी आरोग्य शिक्षण व जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते याप्रसंगी महाजन यांनी केले.

 

विविध आजारावर असलेल्या योजनांची माहिती युती शासनाचे कालावधीत  मुख्यमंत्री निधीतून मोठ मोठ्या आजारा करीता अनेकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय निधी दिल्याने अनेकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाल्याचे सांगत पण गेल्या दीड-दोन वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी गोरगरीब रुग्णांना अशा प्रकारची उल्लेखनीय मदत मिळाली नसल्याची खंत ही यावेळेस त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या आरोग्य योजने अंतर्गत अनेक आजारांवर खासगी रुग्णालयातून आपण आर्थिक दृष्टया कमकुवत व गरजु रुग्णांवर उपचार करून रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, अमोल जावळे ,पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील हे उपस्थित होते.

खासदार रक्षाताई खडसे, प्रा मुकेश येवले, आमदार शिरीष चौधरी, हर्षल पाटील यांनी रुग्ण सेवेच्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. जनसेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ.फेगडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमास मान्यवर मंडळी व नागरीक उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन श्री.चतुर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी मानले.

Protected Content