Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युतीची चर्चा गेली खड्डयात : उध्दव ठाकरेंचा संताप

बीड प्रतिनिधी । युतीची चर्चा गेली खड्डयात…आधी शेतकर्‍यांच्या मदतीचे बोला अशा शब्दांमध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. यामुळे युतीच्या मार्गातील अडसर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उध्दव ठाकरे आज मराठवाडा दौर्‍यावर असून बीडमध्ये त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकर्‍याचं काय करता ते बोला. कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. सरकारी यंत्रणेचा सुस्त अजगराला ढोसकण्यासाठी मी फिरतोय असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. ना तुम्ही शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात. जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला. राफेल घोटाळ्यापेक्षा पीक वीमा योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. ही पंतप्रधान फसवणूक योजना बनली आहे, अशी तोफही उद्धव यांनी डागली. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करतांना रडवावे असे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले.

Exit mobile version