Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युगपुरुष यांचे विचार आत्मसात करण्याची गरज – डॉ. भोळे

पुणे :: प्रतिनिधी । सरदार पटेलांनी कणखरपणा अंगी बाळगून राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचा मंत्र दिला. भारत देश एकसंध ठेवण्याचे महनीय कार्य केले. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे विभूतिपूजा होय. नवीन पिढीने त्यांचे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे त्यांची शिकवण प्रत्यक्ष अमलात आणावी ” असे मत समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.

डॉक्टर रवींद्र भोळे अध्यक्ष असलेल्या सरदार पटेल लेवा पाटील समाज मंडळ या संस्थेने उरळी कांचन येथे सरदार वल्लभाई पटेल जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते होते.

. ह्यावेळी सरदार पटेलांचा आदर्श घेऊन समाजातील बांधवांनी विविध क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करावी तसेच शैक्षणिक क्षेत्र व शेती याशिवाय औद्योगिक क्षेत्र व व संरक्षण विषयक क्षेत्रात प्रगती करण्याची अत्यंत गरज आहे , असेही ते म्हणाले .कार्यक्रमाला चंद्रकांत चौधरी, तोषक चौधरी , दीपक फेगडे, संगीता रवींद्र भोळे (संचालक अस्मिता महिला नागरी सहकारी पतसंस्था) व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Exit mobile version