Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

या देशात कसाबलाही कायदेशीर हक्क मिळाले ; अनिल देशमुखांचा युक्तिवाद

मुंबई : वृत्तसंस्था ।  २६/११च्या हल्लय़ातील आरोपी कसाबलाही कायद्याचा लाभ मिळाला परंतु माझ्यावर गुन्हा दाखल करताना सीबीआयने कायद्याला बगल दिली असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे  उच्च न्यायालयात करण्यात आला. 

 

भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी देशमुख यांच्यावतीने अ‍ॅड्. अमित देसाई यांच्या वतीने युक्तिवाद केला आहे.आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला कायदेशीर हक्क मिळतात , असेही ते म्हणाले

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला परवानगी दिली.

 

 

Exit mobile version