Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल सराफा दरोडा प्रकरणातील तिसऱ्या संशयित आरोपीस शहरातून अटक

यावल प्रतिनिधी । शहरातील बाजीराव काशिदास कवडीवाले यांचे सराफा दुकानावर ७ जुलै रोजी टाकलेल्या दरोडा प्रकरणातील पडद्या मागचा तिसरा संशयित आरोपीला यावल पोलिसांनी आज शुक्रवारी सायंकाळी अटक केली आहे. यापुर्वी या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजून दोन संशयित आरोपी फरार आहेत. 

सराफा पेढीवर चार जणांनी देशी कट्ट्याचा धाक दाखवून सोन्याच्या दागीन्यासह साडेअकरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता याबाबत सराफा व्यवसायीक व शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी दिलेल्या अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल असली तरी या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

येथील बाजीराव काशिदास कवडीवाले यांची सराफा पिढीवर ७ जुलै रोजी भरदिवसा दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवून दरोडा टाकून ५० हजार रुपयांची रोकड आणि साडे अकरा लाख रुपयाचे दागिने असा एकुण १२ लाखांचा ऐवज लूटून नेला होता. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपींना शहरासह दुकानाची व परिसराची माहिती पुरवणारा येथील बोरावल गेट परिसरातील तिसरा संशयित आरोपी यश विजय अडकमोल याला पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पथकाने त्याचे राहत्या घरातून अटक केली आहे.  आता अटकेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे.

यापूर्वी या गुन्ह्यात संशयित आरोपी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड ( मुंबई ) चंद्रकांत  उर्फ विकी लोणारी( भुसावळ ) यांना आदीच अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत लोणारी यास शुक्रवारी येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायाधीश एस एम बनचरे यांनी २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

शुक्रवारी १६ जुलै रोजी पोलिसांनी अटक केलेला यश विजय अडकमोल हा स्थानिक रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले यातील मुख्य आरोपी मुकेश भालेराव याचा मित्र असल्याचे सांगून दुकाना सह परिसराची रेकी अडकमोल यांनीच केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटकेत असलेल्या  संशयित आरोपी चंद्रकांत लोणारी हा दुकानात शिरून दरोड्यातील  चार संशयित आरोपी मध्ये सहभागी होता. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी दुकान परिसरात त्यास फिरवुन त्याचेकडून माहिती घेतली तसेच मुद्दे माला विषयी तपास केला असता दरोड्यातील १५ हजार ३८० रुपयाच्या नोटा पोलिसांनी साकेगाव शिवारातील तापी नदीच्या खोऱ्यात दरोड्यातील जीर्ण नोटा फेकल्या असल्याचे सांगितल्यावरून त्या नोटा आज जप्त केल्या आहेत. दरोडा प्रकरणातील अजून मुख्य तीन आरोपी फरार असून आहेत. मुद्देमाल जप्त करणे व स्थानिक आरोपीस अटक करण्याच्या पथकात पो. नि. सुधीर पाटील हे.कॉ. संजय तायडे, असलम खान ,सुशील घुगे, भूषण चव्हाण, गणेश ढाकणे, रोहील गणेश ,निलेश वाघ या पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Exit mobile version