यावल शहरात रोगप्रतिबंधक औषध फवारणीची मनसेची मागणी

 

 

यावल : प्रतिनिधी । यावल शहरात रोगप्रतिबंधक औषध फवारणी करावी अशी मागणी करणारे निवेदन आज मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले

 

शहरातील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात काही दिवसांपासुन सातत्याने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या व अत्यंत घातक लाटेची लक्षणीय वाढ होत असतांना नगर परिषदच्या माध्यमातुन कोणतीही  खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत   रोग  प्रसार रोखण्यात दिरंगाई व दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई  करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे .

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी तहसीलदार  यांना ७ एप्रीलरोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल शहरामध्ये दोन महिन्यापासुन कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे  नगर परिषदच्या माध्यमातुन शहरात  रोग प्रतिबंधक औषध  फवारणी व धुर फवारणी करण्यात यावी  या मागणीचे मुख्याधिकारी यांना या आधीच देण्यात आले  होते तरीही  कोणतीही उपाययोजना करण्यात  आलेली नाही कोरोना संसर्गामुळे यावल शहरातील सर्व प्रभागामध्ये दोन दिवसाआड कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी व धुर फवारणी करण्यात यावी , तात्काळ उपाययोजना न झाल्यास संबधीत आरोग्य अधिकारी व आरोग्य निरिक्षक यांच्यावर कलम २६९  ,   कलम २७०  नुसार कारवाई करावी

 

फैजपुरचे तत्कालीन प्रांतअधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांनी कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेवुन लोकवर्गणीतुन ७ लाख रुपये खर्चाचे ऑक्सीजन बॅडची उभारणी केली होती पण एकाही रुग्णाला उपयोग होत नाही प्रशासनाने परिस्थिती गांर्भीयाने लक्ष देवुन जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या विषयाकडे लक्ष  द्यावे यावल शहरात २० बेडचे कॉविड सेंटरची उभारणी करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे  .

 

यावल तहसीलदार कार्यालयातील निवडणुक शाखेचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांना दिलेल्या निवेदनावर मनसेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर , विभागीय अध्यक्ष आबीद कच्छी , तालुका उपाध्यक्ष शाम पवार , शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , विपुल देवरे यांच्या  सह्या  आहेत

Protected Content