यावल शहरात तरुणाच्या मृत्यूनंतर फवारणीस प्रारंभ

यावल,  प्रतिनिधी । काल शहरात डेंग्यूने एका उच्च शिक्षित तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर आज नगर परिषद प्रशासनाला जाग आली असून त्यांनी विविध भागात जंतूनाशक धूर फवारणीस सुरुवात केली आहे.

 

या संदर्भात नगर परिषदच्या सुत्रांकड्डन मिळालेल्या माहितीनुसार,  काल दि. ११ सप्टेंबर रोजी शहरातील विस्तारीत वसाहती मधील गणपती नगरमध्ये राहणारे आदिवासी  शिशक गनी तडवी यांचा २३ वर्ष वयाचा एकुलता एक उच्च शिक्षीत तरुण सादीक तडवी या तरूणाचा डेंग्युमुळे दुदैवी मृत्यु झाला.  अचानक तरूणाचा डेंग्युमुळे झालेल्या मृत्यु संपुर्ण यावल शहरात नागरीकांमध्ये आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने भिती व्यक्त करण्यात येत आहे. यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष सौ. नौशाद मुबारक तडवी, नगरसेवक तथा गटनेते अतुल पाटील, मुख्यधिकारी अविनाश गांगोड़े यांनी स्वच्छता विभागाला नागरी वस्ती तात्काळ जंतुनाशक फवारणीचे आदेश दिल्याने आजपासुन यावल शहरातील बाबानगर परिसरातुन जंतुनाशक धुर फवारणीस सुरुवात करण्यात आली.  या धुर फवारणीत यावल नगर परिषदचे स्वच्छता निरिक्षक दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शेख मंजर शेख अजगर , रामदास  घारू व आदी कर्मचारी यात धुर फवारणी मोहीमेत सहभागी झाले आहे.

 

Protected Content