Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरात घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने लांबविली

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील  तिरूपती नगरामध्ये घराबाहेर लावलेली दुचाकी चोरटयाने लांबविल्याची घटना समोर आली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

या संदर्भातील पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील श्रीराम नगरमध्ये  राहणारे  सेवानिवृत्त तलाठी विठ्ठल गिरधर सुर्यवंशी हे आपल्या कामानिमित्त तिरूपती नगरातील राहणारे ईश्वर रमेश कोळी यांच्या घरी आसीफ खान युसुफ खान यांच्या मालकीची दुचाकी मोटरसायकल क्रमांक एमएच १९ एआर ९२६९या वाहनाने आले असता, घराबाहेर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरटयानी लांबविल्याची घटनासमोर आली असुन , याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूद्ध विठ्ठल सुर्यवंशी यांनी खबर दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे तपास करीत आहे.

Exit mobile version