Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरातुन अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण

 

 यावल : प्रतिनिधी  ।   शहरातील फैजपूर रोडवरील सुभानी पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेवर राहणाऱ्या एका उतारकरूच्या  अडीच वर्षाच्या मुलाचे  एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याने  परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

 

पोलीसात संशयीत व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यावल शहरातील फैजपुर मार्गावरील सुभानी पेटूॉल पंपा समोरील हरी ओम नगरच्या मोकळ्या जागेवर काही दिवसापासुन सादीक शाह ( वय २८ वर्ष,  रा- गोशलपुर , ता – सोहरा,  जि – जबलपुर , मध्य प्रदेश ) हे कुटुंबा सोबत राहात आहेत   २  एप्रिलच्या  पहाटे  ४ वाजेच्या पुर्वी त्याच ठीकाणी परिसरात फिरून झोपत असलेला  संशयीत आरोपी दिपक (पुर्ण नांव व पत्ता माहीत नाही )  याने कुटुंब झोपेत असतांना आमच्या अडीच वर्षाच्या अरमान शाह नांवाच्या मुलाचे  अपहरण केल्याची तक्रार दिली  सादीक शाह यांचे कुटुंब सकाळी जागे झाल्यावर त्यांना त्यांचा अडीच वर्षाचा अरमान आईजवळ मिळुन आला नाही त्यामुळे भयभीत झालेले शाह कुटुंबांनी  चिमकुल्याचा परिसरात शोध घेतला पण तो  व्यर्थ ठरला  त्याच ठीकाणी असलेला दिपक नांवाचा  संशयीत आरोपीदेखील दिसत नसल्याने अखेर अरमान शाह यांचे वडील यांनी यावल पोलीस स्टेशनला दिपक नांवाच्या व्यक्ति विरूध्द फिर्याद दाखल केली

 

 

दरम्यान घटनेचे वृत्त कळताच जेष्ठ पो नि अजमल पठान व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली .पो नि सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांच्या शोध कार्याला वेग आला आहे .

Exit mobile version