Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरातील स्वस्त धान्य दुकानात चोरी

यावल प्रतिनिधी । येथील एका स्वस्त धान्य दुकानात अज्ञात चोरटयांनी दुकानातील धान्य चोरून नेल्याची घटना घडली असुन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील म्हसोबा परिसरातील मेन रोडला असलेली यावल सहकारी ग्राहक भंडार दुकान क्रमांक १८ यांच्याव्दारे संचलीत स्वस्त धान्य दुकानात दिनांक २५ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरटयांनी दुकानाचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. त्यांनी सर्वसामान्य लाभार्थी नागरीकांच्या वितरणासाठी ठेवलेल्या धान्यातील पाच क्विटंल गहू, अडीच क्विटंल मका असे भरडधान्य शासकीय किमत सुमारे चार हजार रुपये तर बाजार भाव किमत अंदाजीत१० हजार रुपये किमतीचे गहु तर सुमारे ३ हजार रुपये किमतीचा मका असे साहीत्य चोरीस गेले आहे.

याबाबत दुकान संचालक केशव प्रल्हाद बढे यांनी यावल पोलीस तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरटयांच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा नोदंविण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहेत.

Exit mobile version