Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल रावेर विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकरण्या बरखास्त – जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवक कार्यकारणीचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिलेल्या आदेशानुसार यावल रावेर विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकरण्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.

.

यावल रावेर विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसची पुढील नविन कार्यकारणीची निवड होईपर्यंत यावल रावेर विधानसभा मतदार संघामधील सर्व शहर पातळीवरील कार्यक्षेत्रातील युवक काँग्रेस पक्षातील संपुर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असल्याचे रावेर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख मो. फैजान अब्दुल गफ्फार शाह यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. युवक काँग्रेस पक्षाच्या आपल्या मागील पदाचा कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी पदाचा वापर करू नये अन्यथा त्यांच्यावर पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ही युवक काँवेसचे जिल्हा अध्यक्ष देवेन्द्र मराठे व यावल रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मोहम्मद फैजान अब्दुल गफ्फारशाह यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Exit mobile version