Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल-रावेर क्रेडिट अॅक्सिस शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थिनींना सायकल वितरण  

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | क्रेडिट अॅक्सिस इंडिया फाऊंडेशन तसेच क्रेडिट अॅक्सिस ग्रामीण लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील यावल व रावेर शाखेच्या वतीने या ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीना एका कार्यक्रमात समारंभपूर्वक सायकल बॅग व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली.

क्रेडिट एक्सिस इंडिया फाउण्डेशन ही भारतातील सर्वात मोठी मायक्रो फायनान्स संस्था असून, संस्थेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाव्दारे ग्रामीण विद्या अंतर्गत जळगाव जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीमध्ये कुमारी कल्पश्री, किशोर दलाल राहणार रावेर या विद्यार्थिनींना दोन हजार ते दोन हजार बावीस इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 96 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे. याची दखल घेऊन क्रेडिट ग्रामीण लिमिटेडने तिचा कौतुक सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडला.

या कार्यक्रमामध्ये क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेडची क्षत्रिय अधिकारी संजय द्वासे व राजकुमार बेड दीवार व तसेच यावल शाखेचे शाखाधिकारी योगेश पळसपगार व जामनेर शाखेचे शाखाधिकारी संतोष पवार उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थिनींची आईवडील सुद्धा कुटुंबासह उपस्थित होते.

ग्रामीण विद्या या उपक्रमाद्वारे फाऊंडेशन सरकारी शाळांमध्ये शिकलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींना एक वेळच्या गरजेनुसार आर्थिक साहाय्य करते. इयत्ता दहावीच्या पुढे अभ्यास करण्यास याद्वारे प्रोत्साहन दिले जाते असे आयोजकांनी सांगितले.

Exit mobile version