Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे सातबारा फेरफार नोंदणी शिबीरास प्रारंभ

यावल,  प्रतिनिधी ।  येथील महसुल प्रशासनाच्या वतीने तलाठी कार्यालयात सातबारा उताऱ्यामधील चुका दुरूस्त करणे व आदी महसुलच्या प्रशासकीय कामाबाबत तीन दिवसीय शिबिरास प्रारंभ करण्यात आला. 

 

प्रांत अधिकारी कैलास कडलग आदेशाने आणि  तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २१ जून  रोजी तालुका महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन सातबारा दुरूस्ती तीन दिवसीय २१, २२ आणि  २३जूनपर्यंत चालणाऱ्या शिबीराची आजपासून प्रारंभ करण्यात आला.  या शिबीरात खातेदार , शेतकरी व नागरीकांच्या सातबारा मधील चुका दुरूस्ती करणे, ज्या खातेदारांचे हस्तलिखित सातबारा मधील नांवे चुकीची असतील त्या महसुली कलम१५५ अन्वये दुरूस्त करणे, अहवाल  निरंक करणे, फेरफार नोंदी  लिखित करणे आदी महसुली कामासाठी एक दिवसीय शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यास यावल आणि परिसरातील नागरीक व शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावलच्या चावडीवरील तलाठी कार्यालयात पार पडलेल्या महसुली सातबारा फेरफार शिबीरात यावल मंडळाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी , यावल तलाठी ईश्वर कोळी, कोरपावली व टाकरखेडा येथील तलाठी मुकेश तायडे , परसाडे गावाचे तलाठी समिर तडवी, कोळवदचे तलाठी संदीप गोसावी , निमगाव चे तलाठी विशाल चौधरी , विरावली गावाचे तलाठी हेमंत मारूडे व सजेतील सर्व कोतवाल यांनी परिश्रम घेवुन या शिबीरास यशस्वी केले. महसुलच्या या सातबारा फेरफार शिबीरास यावल व परिसरातील शेतकरी, खातेदार व नागरीकांच्या मोठा प्रतिसाद लाभला. यावल आणि  परिसरातील खातेदार शेतकरी व नागरीकांनी आपल्या सातबारा फेरफार नोंदणी संदर्भात कामे करावयाची असतील त्यांनी २३ जूनपर्यंत यावल शहराच्या तलाठी कार्यालयावर आवश्यक त्या कागदोपत्रासह उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे.

 

Exit mobile version