Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नाभिक समाज बांधवांच्या वतीने आज  श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ. कुंदन फेगडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

 

यावल येथे श्री. जिवा महाले नाभिक बहूउदेशिय संस्थेच्या वतीने  संत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन रमाबाई देशपांडे सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात करण्यात आले.  या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुंदन फेगडे हे होते.      याप्रसंगी डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून  अभिवादन करीत आदरांजली अपर्ण करण्यात आली. तसेच अयोजकांच्या वतीने डॉ.कुंदन फेगडे यांचा स्वागत सत्कार करण्यात आले.          श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. कुंदन फेगाडे यांनी  संत सेना महाराज यांची एकूण ७० प्रतिमा नाभिक समाज बांधवांना सप्रेम भेट म्हणून दिल्या. याप्रसंगी  माजी सैनिक  गंगाधर पगारे, डॉ. युवराज चौधरी, विठ्ठल वारूळकर, संस्थेचे अध्यक्ष अनिल  चौधरी, उपाध्यक्ष  सुपडू वारूळकर, जीवा महाले,  रणजित ठकरे, दिलीप चौधरी, सुनील सनासे, रवी अमोडकर, सुपडू वारूळकर,  राजेंद्र चौधरी,  सुरेश चौधरी व संचालक मंडळ आणि नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version