Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे शौर्य अकादमीच्या शाखेचे उद्घाटन

9a28c483 ff39 4b69 bae1 5ce248684a33

यावल, प्रतिनिधी | येथील व्यासनगर परिसरातील न्यू बचपन प्ले स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भुसावळच्या शौर्य अकादमीच्या वतीने येथील शाखेचा उद्घाटन सोहळा नवीन क्लासच्या ठिकाणी उत्साहात पार पडला.

 

या उद्घाटन च्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकादमीचे संचालक प्रविण नायसे यांनी केले. प्रमुख पाहुणे अॅड. देवकांत पाटील यांनी शौर्य अकादमीच्या या वाटचालीचे कौतुक केले.कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भुसावळचे रहिवासी आणि जळगावच्या बेंडाळे महिला महाविद्यालयाचे संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, आशीर्वाद फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते.

लेकुरवाळे सरांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानात त्यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्व व त्याचे नेमके स्वरूप विद्यार्थ्यांसमोर विशद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शीतल पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version