Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरांजली

यावल प्रतिनिधी । येथील तालुका शिवसेनेच्या वतीने हिन्दु हृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावल तालुका शिवसेनाच्या वतीने येथील जे.टी. महाजन व्यापारी संकुलनातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आज शिवसेनाप्रमुख हिन्दू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

या निमित्ताने उपस्थित शिवसेनेचे यावल तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, माजी नगरसेवक तथा कृउबा समितीचे संचालक सुनिल बारी, तालुका उपप्रमुख शरद कोळी, सेनेचे यावल शहर उपप्रमुख संतोष खर्चे, आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी आर. के. चौधरी, सागर बोरसे, योगेश चौधरी, मोहसीन खान, अजहर खाटीक, पप्पु जोशी, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, किरण बारी, भरत चौधरी, शकील पटेल, चेतन पाटील, चंद्रकांत चौधरी, रिषी दिपक बेहेडे, प्रकाश धोबी, सागर देवांग, ज्ञानेश्वर चौधरी, अनिल पाटील आदी तालुक्यातील मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभीवादन करून आदरांजली वाहीली.

Exit mobile version