Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

यावल, प्रतिनिधी| हिन्दु ह्वदयसम्राट शिवसेनाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त यावल शिवसेना तालुका शाखाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त पार पडलेल्या अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील व सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते सेना प्रमुखाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, संचालक नितिन व्यंकट चौधरी, नगरसेवक दिपक बेहडे, माजी नगरसेवक व सेनेचे शहर संघटक सुनिल बारी, शहर उपप्रमुख योगेश चौधरी, आर. के. चौधरी , सेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी, शहर उपप्रमुख संतोष खर्चे, पिंप्रीचे सरपंच मोहन कोळी, सागर देवांग, विभागप्रमुख योगेश पाटील, सेना आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष हुसैन तडवी, आशिष झुरकाळे, सागर बोरसे , सेना तालुका संकटक अल्पसंख्यांक अजहर खाटीक, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, राजु पाटील, संदेश पाटील, गजु भोसले यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version