Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे शिवसेनातर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

यावल प्रतिनिधी । भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाविषयी अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज यावल येथे रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले.

केन्द्र शासनाने बहुमताच्या जोरावर देशातील अन्नदाता शेतकरी बांधवांना देशोधडीला लावणारे तिन कायदे मंजुर केले असुन हे कायदे देशातील बडे उद्योगपतींच्या आर्थिक हिता व शेतकऱ्यांना संपवणारे असुन, केन्द्र शासनाने तात्काळ कायदे रद्द करावे या करीता देशातील शेतकरी बांधवांचे मागील १६ दिवसांपासून आंदोलन सुरू असून या आंदोलनाला शिवसेनेने पाठींबा दिलाय. दरम्यान, केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलची मोठ्या संख्येने दरवाढ केल्याच्या निषेधार्थ भुसावळ टी-पॉईट चौकात कृउबा समितीचे चेअरमन व शिवसेने उपजिल्हाप्रमुख तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे नेते दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर पेट्रोल डिझेल संदर्भात रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे, यावलचे नगरसेवक दीपक, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, तालुका संघटक गोपाल चौधरी, संतोष खर्चे, पप्पू जोशी, शरद कोळी, जितु फालक, आदीवासी सेनेचे तालुकाध्यक्ष हुसैन तडवी, सागर देवांग, किरण बारी, कृउबाचे संचालक सुनील बारी, निलेश पारसकर, सुधाकर धनगर, राजेंद्रनाथ, अमित पटेल, नितीन बारी, सचिन कोळी, स्वप्नील करांडे, दिनेश साळुंके, सागर बोरसे, योगेश राजपूत, योगेश पाटील, चेतन राजपूत यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Exit mobile version