Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर

यावल प्रतिनिधी । यावल तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात न्या.एम.एस. बनचरे यांनी कायदेविषयक शिबीरात आज गुरूवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.  या शिबीरात महीलावरील होणारे अत्याचार, शासनाच्या वतीने विधवा निराधार, जेष्ट नागरीकांना मिळणाऱ्या विविध योजनांची परिपुर्ण माहिती देवुन जनजागृतीसाठी प्रयत्न करणे, महीलांना बचत गटांच्या माध्यमातुन मिळणारे फायदे, खुन करणे किंवा खुन करण्याचे प्रयत्न करणे या विविध विषयांवर उपस्थितांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलीत. यावेळी न्यायधिश एम.एस बनचरे यांनी कायदेविषय विविध विषयांवर उपास्थितांचे मार्गदर्शन केले. या कायदेविषयक शिबीरास तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितिन चौधरी, अॅड. एस. आर. लोंढे , अॅड, अजय कुलकर्णी, अॅड उमेश बडगुजर, पीएलव्ही हेमंत फेगडे,  न्यायलयातील कर्मचारी एच. जी. सुर्यवंशी, एस. जे. ठाकुर, महेश सपकाळे, गजानन लाढ, शशीकांत वारूळकर, उमेद अभीयानाचे तालुका प्रभाग समन्वयक शरद जेशेंडे आदी उपस्थित होते. या शिबाराचे सुत्रसंचलन अॅड. अशोक सुरळकर यांनी केले तर आभार अॅड. अजय कुलकर्णी यांनी मानले.

Exit mobile version