यावल येथे वकृत्व स्पर्धेत सुचिता बडगुजर प्रथम

यावल, प्रतिनिधी |  येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या विद्यार्थी विकास व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ ते १२ ऑक्‍टोबर दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात आला. याअंतर्गत विद्यालयाच्या सभागृहात विविध स्पर्धा व व्याख्यानाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराची माहिती  होणे ,या अधिकाराचा वापर कधी व कसा करावा याबाबतची जाणीव निर्माण व्हावी हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धत सुचीता बडगुजर, कोमल बोरणारे व जयश्री पाटील यांनी या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी  राष्ट्रीय पातळीवर प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील घेण्यात आली. यात एकूण ९२ स्पर्धक सहभागी झाले होते.  या स्पर्धेत शम्स तरबेज खान, मोमिन  शेख व पुनम सरोदे हे क्रमशः प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.         याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य  संजय पाटील यांचे माहितीच्या अधिकाराचे महत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी  माहिती अधिकाराचा प्रारंभ ,त्याची पार्श्वभूमी, महत्त्व व त्याची मूलतत्त्वे यावर सविस्तर माहिती दिली . कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ विभागातील वरिष्ठ अध्यापक  दिलीप मोरे यांनी आपल्या भाषणात असे प्रतिपादित केले की शासनाच्या व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी अधिकार्‍यांमध्ये तत्परता व कार्यशीलता निर्माण होण्यासाठी सदर अधिकाराचा अधिक लाभ होतो .सदर सप्ताहाचे आयोजन प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी तर आभार  विद्यार्थी विकास, समितीचे प्रमुख डॉ. सुधीर कापडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी  उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील ,प्रा. एम. डी  खैरनार ,समन्वयक प्रा. एस. आर. गायकवाड, मनोज पाटील , ईश्वर पाटील ,डॉ. पी .व्ही .पावरा, डॉ. एच .जी .भंगाळे व प्रा. आर.डी .पवार यांनी परिश्रम घेतले.

Protected Content