Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील व्यास शिक्षण मंडळ यावल व्दारे संचलीत जे. टी. महाजन इंग्लिश स्कुलच्या वतीने आज थोर स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

आज शनिवार, दि. २३ जुलै रोजी लोकशिक्षण, राजकीय जागृती, अन्यायाचा प्रतिकार या त्रिसुत्रीचा अवलंब करून इंग्रजांविरूद्ध लढा देणारे व ब्रिटीशांसमोर प्रथमच संपूर्ण स्वराज्यची मागणी करणारे स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांची जयंती जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.                  स्कुलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य रंजना पाटील यांनी भूषवले. राजश्री लोखंडे यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी भारुड यांनी केले तर वैशाली अडकमोल यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी शिक्षिका लता इंगळे आणि रेश्मा पाटील यांनी लोकमान्य टिळकांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने अमृत महोत्सव लसीकरण शाळेत covid-19 लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात आला.

 

Exit mobile version