यावल येथे राजगृहावर हल्ल्याचा निषेध; भिम टायगर संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

यावल प्रतिनिधी । मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह कार्यालयावर काही समाजकंटकांनी हल्ला करत नासधुस केली. घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी भिम टायगर संघटनेतर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दादर मुंबई भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह कार्यालयावर काही समाजकंटकानी घुडगुस घालुन कार्यालयाची नासघुस केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे यांच्या राजगुह हे केवळ घर नसून देशाच्या समस्त आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान आहे. डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्याभरची कमाई असलेले अतुलनिय पुस्तके देखील आहे. केवळ पुस्तकासाठी घर बांधणे हे संपुर्ण जगाच्या इतिहासात अजरामर झालेले आहे. ऐतिहासीक वास्तूला काही समाजकंटक पुसूपाहत आहे. या घटनेतीत गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीचे निवेदन संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, यावल तालुकाध्यक्ष संदीप निकम, युवा शाखेचे यावल तालुकाध्यक्ष शंकर साबळे, सचिव किरण अडकमोल, युवा शाखेचे तालुका उपाध्यक्ष पवन वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली असून यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्याकडे केली आहे.

Protected Content