Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे महिलेचा विनयभंग; १२ जणांविरोधात गुन्हा

यावल प्रतिनिधी । येथील खाटीक वाड्यात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात दहा ते बारा जणांनी शिवीगाळ व मारहाण करत गळ्यातील सोन्याची पोत तोडून छेडखानी करून विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास खाटीक वाड्यात राहणाऱ्या शहनाजबी राऊफ खाटीक (वय-४०) यांच्या घरात शिरून आरोपी कमलाकर अर्जुन सुरवाडे, रोहित संतोष सुरवाडे, रविंद्र रघुनाथ सुरवाडे, विजय सुपडू गजरे, वामन डांबरे, ज्ञानेश्वर वसंत सावकारे, बंटी मंगल जयकारे, नितीन देवराम डांबरे, विशाल सुनील सुरवाडे, सुनील सुधाकर सावकारे, जग्गू मोहन सावकारे आणि कमलाकर सुरवाडे यांची बहीण मनीषा सुरवाडे या सर्वांनी फिर्यादी यांच्या लाठ्याकाठ्या व लोखंडी गज घेऊन घरात शिरून शिवीगाळ करून महिलेसोबत त्याच्या मुलगा रेहान खाटीक यास बेदम मारहाण केली. यातील आरोपी विजय सुपडू गजरे, रविंद्र रघुनाथ सुरवाडे, जग्गू मोहन सावकारे यांनी सदर महिलेस शिवीगाळ मारहाण करून आपल्या अंगावर ओढले व लज्जा वाटेल असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. महिलेच्या गळ्यातील सोन्याची तोडली. या घटनेमुळे परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावल पोलीस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीत तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नेताजी पंडित वंजारी हे करीत आहे.

Exit mobile version