Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे महाशिवरात्री निमित्ताने प्रसाद वाटप

yawal1122

यावल, प्रतिनिधी । येथील शहराच्या विस्तारित भागातील वसाहतीत असणाऱ्या गंगानगर परिसरातील महादेव मंदिरात आज सायंकाळी महाशिवरात्रीनिमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले.

महाशिवरात्री निमित्ताने यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे तसेच यावल नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंत पाटील यांच्या हस्ते महादेव मंदिरात शिवच्या प्रतिमेची पूजा-अर्चना करण्यात आली. याप्रसंगी भाविकांना प्रसाद वितरित करण्यात आले. यावेळी पत्रकार डी. बी. पाटील, अय्युब पटेल ,सुनील गावडे ,शेखर पटेल, अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगाजल मित्र मंडळ यावल येथील तरुण युवकांनी परिश्रम घेतले. प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाला शहरातील व गंगानगर परिसरातील भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला.

Exit mobile version