Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे मराठा सेवा संघातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद यांना अभिवादन (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । येथील मराठा सेवा संघ व मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेच्या विद्यमाने राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान व आदर्श स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली अपर्ण करण्यात आली.

यावल येथील यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या व्यापारी संकुलनातील परिसरात स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ यांची ४१३वी आणी युवकांचे प्रेरणादायी आदर्श स्थान स्वामी विवेकांनद यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली , या प्रसंगी यावल नगर परिषदचे गटनेते व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, जिल्हा परिषद सदस्य तथा कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, यावलचे पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, अॅड. निवृत्ती पाटील , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे निवृत्ती धांडे, धंनजय पाटील, संदीप सोनवणे, नावरे येथील माजी सरपंच व सदस्य समाधान पाटील, राष्ट्रवादीचे सईद शेख रशीद, हाजी फारूक शेख, सिमा अशोक तायडे, गणेश जोशी, प्रविण पाटील, गणेश महाजन, सामाजीक कार्यकर्त एजाज देशमुख, पत्रकार डी बी पाटील ,देव गुर्जर सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव व पत्रकार अरूण पाटील, पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार शेखर पटेल, पत्रकार सुनिल गावडे, पत्रकार विक्की वानखेडे, पत्रकार रवीन्द्र आढाळे, अशोक तायडे, सुधाकर धनगर आदी विविध समाज बांधवांनी यात सहभाग घेवुन याप्रसंगी उपस्थित सर्वमान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पाजंली वाहण्यात येवुन भावपुर्ण आदरांजली अपर्ण करण्यात आली . दरम्यान कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ व मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तालुका अध्यक्ष अजय पाटील, डी .बी . पाटील , सुनिल गावडे आदींनी परिश्रम घेतले .

 

Exit mobile version