Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे भारतीय जनता पक्षाचा ४१वा स्थापन दिवस साजरा

 

यावल,  प्रतिनिधी  । येथे भारतीय जनता पक्षाचा ४१वा स्थापन दिवस पक्षाचे नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांच्या संपर्क कार्यालयात पक्षाचे थोर दिवगंतांचे स्मरण करत त्यांच्या प्रतिमांचे पुजन करून साजरा करण्यात आला.

आज दिनांक ६ एप्रील १९८o या दिवसी पक्षाची स्थापना करण्यात आली होती. यावल येथील भारतीय जनता पक्षाचे  नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांच्या आई हॉस्पीटल येथील संपर्क कार्यालयात आज भारतीय जनता पक्षाचा ४१वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.  यावेळी भाजपा यावल तालुका अध्यक्ष तथा माजी नगरसेवक उमेश रेवा फेगडे , नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारतमाता,  छ्त्रपती शिवाजी महाराज, पंडीत दिनदयाल उपाध्याय, डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी, भारतत्न पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येवुन त्यांना आदरांजली अपर्ण करण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे यावल शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, परेश नाईक, स्नेहल फिरके,  राहुल फेगडे , भाजयुवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, भालशिवचे गोपाळ तायडे आदी कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिनाच्या  कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला .

 

Exit mobile version