Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे बैलांची बेकायदेशीर वाहतूक; तिघांवर गुन्हा

यावल प्रतिनिधी । खडकाई नदीच्या परिसरात बेकायदेशील सहा बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनावर यावल पोलीसांनी कारवाई केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की, आज २८ जुलै रोजी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे हे आपले सहपोलीस कर्मचारी सुशिल घुगे, पोलीस कर्मचारी शामकांत धनगर, गृहरक्षक दलाचे कर्मचारी शहरातील डॉ.झाकीर हुसैन ऊर्दू हायस्कुलच्या मार्गाने आपल्या गस्ती पथकासह येत असतांना खडकाई नदीच्या पुलावरून परत येत असतांना समोरून येणाऱ्या महींद्रा कंपनीचे पिकअप (एमएच १९ बीएम ३३५७) हे वाहन येत असतांना त्या वाहनास थांबवुन तपासणी केली असता त्या वाहना मधुन ६ गोवंश बैल दाटीवाटीने कोंबुन भरलेल्या अवस्थे वाहतुक करीत असतांना आढळुन आले असुन , पोलीस तात्काळ वाहन ताब्यात घेवुन वाहनचालक दगडु आनंदा साळुंके रा. ठाणे दरवाजा सिद्धार्थनगर चोपडा, क्लीनर आसीम ईसाक शेख मिल्लत नगर चोपडा आणि गाडीमालक जावेदीन काझी रा.मोमीनअली या तिघांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version