Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे पत्ते खेळण्यावरुन एकाला बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा

यावल प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या प्लांटवर पत्ते खेळण्यास मज्जाव केल्याने एका कर्मचाऱ्याला सफाई कर्मचारी यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल नगरपरिषदच्या शहरात होणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर केंद्रावर २५ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फिल्टर हाऊसवरील कर्मचारी दिलीप रामा वाणी (वय-५६) यांनी फिल्टर हाऊसवर काम करतात. याच परिसरात संशयित आरोपी सफाई कर्मचारी असलेले सचिन सुरेश बारसे, बल्लया सुरेश बारसे, निलेश सुरेश बारसे आणी शोभाबाई सुरेश बारसे हे पत्ते जुगार खेळत असतांना दिलीप वाणी यांनी हटकले. याचा राग आल्याने चौघा संशयितांनी लाकडी काठयांनी मारहाण केली. दिलीप वाणी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान ज्या नगरपरिषदच्या फिल्टर हाऊसवर हा प्रकार घडला त्या ठिकाणी मुख्याधिकारी देखील वास्तव्यास असल्याचे बोलले जात असुन तरी हा प्रकार कसा घडला अशी चर्चा नगर परिषद वर्तुळात होत आहे.

Exit mobile version