Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे दर्पणकार जांभेकरांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमेचे अनावरण

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भारतीय बहुउद्देशिय पत्रकार संघाद्वारे आयोजित दर्पणकार जांभेकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

 

यावल येथे आज भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ,महाराष्ट्रच्या वतीने आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयात बाळशास्त्री जांमेकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी त्यांना प्रतिमा भेट करण्यात आली. यावेळी डॉ .कुंदन फेगडे यांनी पत्रकार संघाला प्रत्येक शासकीय कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांमेकरांची प्रतिमा भेट म्हणुन २१ प्रतिमा भेट दिल्यात. याप्रसंगी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी पटेल, प्रदेश सचिव जीवन चौधरी , प्रदेश संघटक सुनिल गावडे, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश चौधरी , जिल्हा सचिव शब्बीर खान, तालुका अध्यक्ष ए. टी. चौधरी, तालुका उपाध्यक्ष फिरोज तडवी, संघटक विक्की वानखेडे, जिल्हा प्रतिनिधी राजेन्द्र आढाळे, दिपक नेवे आदी पत्रकार उपस्थित होते.

Exit mobile version